प्रसाद पाताडे, सिंधुदुर्ग : मातोश्रीचे कट्टर समर्थक असलेल्या कणकवली पं. स. चे माजी सभापती कै. प्रमोद सावंत यांचे चिरंजीव ऍड. प्रसाद सावंत, कासरल गावच्या माजी सरपंच सुवर्णा सावंत, कासरल सोसायटी उपाध्यक्षा नेहा सावंत, ठाकरे शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र कोकम, युवासेना शाखाप्रमुख दीपक कुळये यांच्या सह कासरल गावातील शिवसेना कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.
या प्रवेशाने ठाकरे सेनेला जोरदार झटका लागला आहे. या प्रवेशाने आमदार नितेश राणे हे शिवसेनेला धक्के पे धक्का देत आहेत. 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात आमदार नितेश राणेंनी निवडणुकी आधीच ठाकरे सेनेला हादरे द्यायला सुरुवात केली आहे.
कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भाजपमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित हा प्रवेश घेण्यात आला.
दरम्यान, राज्याच्या राडकरणात राजकीय खळबळ माजलेली असताना शिंदे गट आणि भाजप गट यांच्यात वाद उफाळत चालला आहे. अश्यातच ठाकरे गटातील दिग्गज नेत्यानी शिंदे गटात प्रवेश केला आहे.