Nitesh Rane 
ताज्या बातम्या

"...म्हणून विनायक राऊतांचा पराभव झाला"; नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Published by : Naresh Shende

Nitesh Rane On Uddhav Thackeray And Vinayak Raut : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा शिवसैनिक यांनी राणे साहेबांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्याच पद्धतीने आम्हाला या निवडणुकीत सहकार्य मिळालं. या जिल्ह्यातले जे जुने शिवसैनिक आहेत. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंची काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत जाण्याची भूमिका आवडली नव्हती. उद्धव ठाकरेंची धोरणं आवडली नव्हती. विनायक राऊतांनी या जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचं काम केलं. त्याचा वचपा या निवडणुकीत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी काढलेला आहे. त्याचा अनुभव या निमित्ताने आला आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले, म्हणून त्यांनी जी आम्हाला मदत केली, आम्हाला सहकार्य केलं, त्यासाठी मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. या जिल्ह्यातील उबाठा यापुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की खऱ्या अर्थाने पक्ष राहतो, हे येणाऱ्या काळात कळेलच. जेव्हा उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा झाली. त्या सभेत त्यांनी ज्या काही शिव्याशाप आम्हाला दिल्या, राणे साहेबांना नावं ठेवली, मला शिव्या घातल्या. मी तेव्हाच सांगितलं होतं, याचं उत्तर मतदार मतपेटीतून देतील. मतदानाच्या माध्यमातून वचपा काढतील. उद्धव ठाकरे या मतदारसंघात येऊन आमच्या विरोधात जेव्हढं बोलतील, तेव्हढाच माझा लीड वाढत जातो.

विधानसभेत मला ३० हजार मतांचं लीड होतं. आता लोसभेत ४२ हजार मतांचं लीड झालेलं आहे. येणाऱ्या विधानसभेत मतदार माझ्या मागे आणखी ताकदीने उभे राहतील. माझ्या विरोधकांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, मी कधीच त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण माझे मतदार मला हक्काने सांगतात की तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त आमचा विकास करण्यात व्यस्त राहा. त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा