रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र यातून रोहीत पवार यांची निवड झाली आहे. गेली दोन वर्षे अधिकृत घटनेच्या वादात अडकलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी रोहित पवार यांना पुढे करण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला.
याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी खास ट्वीट केले आहे. त्यांनी हे ट्विट करुन रोहीत पवारांवर शुभेच्छा देत टीका केली आहे. निलेश राणे म्हणाले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.असे म्हणत निलेश राणेंनी रोहीत पवारांवर टीका केली आहे.
रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे यावेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत त्यांना बाजी मारता आली नाही. या निवडणुकीसाठी कार्यकाल संपलेल्या पदाधिकाऱ्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार लांब राहावे लागणार होते.