राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोल्हापुरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर छापेमारी केली आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथे छापे टाकले. यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी एकाच वेळी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमधील १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
एनआयए’च्या पथकाने हुपरी-रेंदाळ दरम्यान असलेल्या अंबाबाईनगर मधील एका घरात छापा टाकला होता. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथेही अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी दोघे ३० ते ३५ वयोगटातील आहेत.
पुणे येथून दहशतवादाच्या संशयातून अटक केलेल्या संशयितांचा जिल्ह्यात वावर होता. त्यांना स्थानिक मदत मिळाली असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून आत्तापर्यंत तिघांची चौकशी ‘एनआयए’कडून करण्यात आली आहे.