New Labour Code | Private Sectors team lokshahi
ताज्या बातम्या

New Labour Code : खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना सरकार देणार भेट? याचा फायदा होणार की तोटा

रजेच्या नियमात ही होणार बदल

Published by : Team Lokshahi

New Labour Code : नवीन कामगार संहिता लवकरच देशात लागू होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी सध्या कोणतीही वेळ निश्चित करण्यात आलेली नाही, असे सरकारने म्हटले आहे. (new wage code how its benefits for private sectors employees)

सर्व राज्यांनी मिळून नवीन कामगार संहिता लागू करावी अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. मात्र आजतागायत सर्व राज्यांच्या सरकारांनी त्यांच्या वतीने मसुद्याला अंतिम स्वरूप दिलेले नाही. येत्या काही महिन्यांत नवीन कामगार संहिता लागू करता आली तर खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे मिळतील.

कामगार कोड

राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी नुकतेच संसदेत सांगितले होते की, बहुतांश राज्यांनी चार कामगार संहितेवरील नियमांचा मसुदा पाठवला आहे. उर्वरित राज्ये ते तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहेत. नवीन कामगार संहिता वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षितता यांच्याशी संबंधित आहेत.

पगारात बदल

नवीन कामगार संहिता चारही बदलांसह लागू केल्यास नवीन वेतन संहितेअंतर्गत खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना अनेक फायदे मिळतील. सर्वप्रथम, त्यांच्या वेतन रचनेत बदल केला जाईल. नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर हातातील पगार पूर्वीपेक्षा कमी होईल.

कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगाराच्या (CTC) 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावा, अशी तरतूद सरकारने नव्या नियमात केली आहे. जर तुमचा मूळ पगार जास्त असेल तर तुमचे FIF फंडातील योगदान पूर्वीपेक्षा जास्त असेल.

सरकारच्या या तरतुदीचा फायदा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी होईल, जेव्हा त्यांना भरीव रक्कम मिळेल. यासोबतच ग्रॅच्युइटीचे पैसेही अधिक मिळतील. म्हणजे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल.

साप्ताहिक सुट्टी

नवीन कामगार संहितेनुसार आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी देण्याची तरतूद आहे. म्हणजे तुम्हाला आठवड्यातून चार दिवस ऑफिसला जावं लागेल आणि तीन दिवस साप्ताहिक सुट्टी मिळेल. मात्र, ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे तास वाढतील. हा नियम लागू झाल्यानंतर जर तुम्ही तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी निवडली तर तुम्हाला ऑफिसमध्ये 12 तास काम करावे लागेल. म्हणजेच, तुम्हाला आठवड्यातून 48 तास काम करावे लागेल. यानंतर तुम्हाला तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळेल.

रजेच्या नियमात बदल

याशिवाय दीर्घ सुट्ट्यांच्या बाबतीतही मोठा बदल होणार आहे. यापूर्वी कोणत्याही संस्थेत दीर्घकालीन रजा घेण्यासाठी वर्षातून किमान २४० दिवस काम करणे आवश्यक होते. परंतु नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर कोणताही कर्मचारी १८० दिवस (६ महिने) काम केल्यानंतर दीर्घ रजा घेऊ शकतो.

पूर्ण आणि अंतिम तोडगा काढण्याबाबत, कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर, बडतर्फी, छाटणी आणि कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांत त्यांचे वेतन दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत, बहुतेक नियम वेतन देय आणि सेटलमेंटवर लागू आहेत. मात्र, यामध्ये राजीनाम्याचा समावेश नाही.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी