ताज्या बातम्या

हिंडेनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल जाहीर; सेबीच्या चेअरमन यांच्यावर गंभीर आरोप

अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल जाहीर झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल जाहीर झाला आहे. यामध्ये सेबीच्या चेअरमन माधवी पुरी-बूच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेआहेत. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचाही हात असल्याचा खुलासा या अहवालातून करण्यात आला आहे.

सेबीच्या सध्याच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप 'हिंडनबर्ग रिसर्च'ने केला आहे. शनिवारी 'हिंडनबर्ग'ने एका ब्लॉगमधून यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. हिंडनबर्गने शुक्रवारी "भारताविषयी लवकरच काही तरी मोठे," असे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले.

त्यांनी असे लिहिले आहे की, "आपण आपले कामकाज सुरू ठेवल्यास, त्यामध्ये कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही याचा अदानींना वाटणारा संपूर्ण आत्मविश्वास आमच्या आधी लक्षात आला होता. त्यामुळे अदानींचे माधवी बुच यांच्याशी असलेल्या संबंधांमधून त्याचा खुलासा मिळेल असे सूचित होत होते. तेव्हा आम्हाला माहित नव्हते की, माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे त्याच बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती, ज्यांचा वापर विनोद अदानींनी (आर्थिक गैरव्यवहारांसाठी) केला होता." आम्ही अदानींच्या भांडवली बाजारातील घोटाळ्याबद्दल 18 महिन्यांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याचा तपास करण्यात 'सेबी'ने आश्चर्यकारकरित्या उत्साहाचा अभाव दाखवला होता असे हिंडनबर्गने म्हटले आहे.

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू