ब्रिटननंतर आता महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाच्या नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळलला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट एरिसने सध्या ब्रिटनची चिंता वाढली आहे. एरिस व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सबव्हेरियंट-EG.5.1 आहे, यालाच एरिस असंही म्हटलं जातं.
ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वीच एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना व्हायरसचा नवीन एरिस व्हेरियंट पहिल्यांदा ब्रिटन (UK) मध्ये आढळून आला.भारतात या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण मे महिन्यातच सापडला होता. अशी माहिती मिळत आहे.
लक्षणे काय आहेत?
घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे.