कर्नाटकमधील भाजप आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी पंडित जवाहलाल नेहरू यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे ते पु्न्हा एकदा चर्चेत आले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य बासनगौडा पाटील यत्नाल यांनी केलं आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
कर्नाटकमधील भाजप आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं की, ''सर्वांना वाटत की, पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण, असं नाही. सुभाषचंद्र बोस पहिले पंतप्रधान होते.'' सुभाषचंद्र बोस यांनीच इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडलं. त्यांच्या भीतीमुळे इंग्रज देश सोडून गेले, असंही गौडा यांनी म्हटलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, उपोषणामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही. तर, तुम्ही एका कानाखाली मारली तर आम्ही दुसऱ्या गाल पुढे करु, असं केल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं होतं. सुभाषचंद्र बोस यांच्या भीतीमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
बासनगौडा पाटील यतनाल हे त्यांच्या विधानामुळे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्टमध्येही त्यांनी कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसचे सरकार येत्या सहा-सात महिन्यांत अंतर्गत भांडणामुळे पडेल, असे म्हटले होते. यानंतर भाजप राज्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करणार आहे.