tara airline Team Lokshahi
ताज्या बातम्या

22 प्रवाशांना घेऊन जाणारे नेपाळचे प्रवासी विमान बेपत्ता; शोधमोहिम सुरु

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : नेपाळचे खासगी तारा एअरलाईनचे (Tara Airline) एक विमान बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 22 प्रवासी प्रवास करत असून यात 4 भारतीयांचा समावेश आहे. याप्रकरणी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.

माहितीनुसार, नेपाळचे तारा एअर 9 एनएईटी (NAET) 'ट्विन-इंजिन विमान' विमानाने 22 प्रवाशांसह पोखराहून जोमसोमला जाण्यासाठी सकाळी 9:55 वाजता उड्डाण केले होते. परंतु, या विमानाचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. हे विमान सर्वात शेवटी मुस्तांगमधील जोमसोमच्या आकाशात दिसले. नंतर ते माउंट धौलागिरीकडे वळले व बेपत्ता झाले.

या विमानातील 22 प्रवाशांमध्ये 4 भारतीय, 3 जपान आणि बाकी सर्व नेपाळी नागरीक आहेत. तर विमानात 3 क्रू मेंवरचा समावेश होता. या विमानाचा दोन खासगी हेलिकॉप्टर व नेपाळचे सैन्य विमाने युध्द पातळीवर शोध घेत आहेत. दरम्यान, विमान कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Shraddha Arya: लोकप्रिय सिरियल "कुंडली भाग्य"मधील अभिनेत्रीच्या घरात नव्या पाहुण्याची चाहूल

Navratri 2024: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योति पेटती राहण्यासाठी घ्या "ही" काळजी

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...