भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना न्यायालयातून दुसरा झटका दिला आहे. सोमवारी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला होतो तर आज किरीट सोमय्या यांचा मुलागा नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे सोमय्या पिता पुत्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेची टीम थेट सोमय्या यांच्या घरावर दाखल झाली आहे. पण अधिकारी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा सोमय्यांचं घर बंद असल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्यावर नोटीस लावली आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी आयएनएस विक्रांत (INS vikrant)प्रकरणी किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला आहे. तसेच सोमय्या यांच्या मुलाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी ठेवली होती. परंतु नील यांचाही अर्ज फेटाळण्यात आला.
तत्पुर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कालपासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर काल जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी टि्वटरच्या माध्यमातून सोमय्या माध्यमांसमोर आले. दुसरीकडे राज्य सरकारकडून त्यांच्या अटकेसंदर्भात तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी तीन पोलिस पथके तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच गृहमंत्रालयाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून झेड सुरुक्षा असलेले सोमय्या गेले कुठे, यासंदर्भात विचारणा केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी सोमय्या यांना पकडण्यासाठी लूक आऊट नोटीस काढा, अशी मागणी केली होती. सोमय्या मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.