संजय देसाई, सांगली
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील चांदोली धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे डोंगर उताऱ्यावर, डोंगरालगत, डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांना सतत पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलखनाचा व अतिवृष्टीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या ठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झाली आणि लोकांना काय उपाययोजना कराव्यात याचे प्रशिक्षण दिले. तर प्रसंगी प्रशासनाने वाडी वस्तीची स्थलांतराची तयारी सुद्धा केली आहे.
2021 साली कोकणेवाडी या ठिकाणी डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडून डोंगर घसरलेला आहेत. त्या पार्श्वभूमीवर या तीन गावांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा व भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो या दृष्टीने प्रशासन व इतर सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम बाधित गावातील लोकांना संकटापूर्वीच्या, संकटानंतरच्या व संकटावेळी कोणता उपाययोजना करायच्या त्या सर्व मार्गदर्शन एनडीआरएफ या टीमने केली.
अंशकालीन विस्थापित होण्यास स्थानिक लोकांचा विरोध आहे. कारण त्यांची सर्व जनावरे त्या वाढीमध्ये असल्यामुळे हिंस्त्र प्राण्यांचा प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात जनावरांच्यावर हल्ला होत असल्याच्या भीतीने लोक गाव सोडायला तयार होत नाहीत. मात्र महाराष्ट्र सरकारने यावर कायमस्वरूपी पुनर्वसन करून आमचा प्रश्न सोडवावा असे सातत्याने बाधित गावातील रहिवासी करत आहेत. बाधित गावातील लोकांना अनेक अडचणींना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. नदी शेजारून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्या की दहा दहा पंधरा दिवस या ठिकाणी वीज खंडित असते यावर एनडीआरएफ टीमने उपाययोजना केली.