Sunil Tatkare On Anant Geete 
ताज्या बातम्या

सुनील तटकरे यांचा अनंत गीतेंवर हल्लाबोल, म्हणाले, "रत्नागिरी-रायगडची जनता..."

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

Published by : Naresh Shende

रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याविरोधात ते राजकीय मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. चिपळूणच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली आहे. अनंत गिते यांच्याकडे विकासाचे मुद्दे नसल्याने ते खालच्या पातळीवर टीका करत आहेत. माझ्याविषयी ज्या चौकशा व्हायच्या होत्या, त्या आता झाल्या आहेत. रत्नागिरी-रायगडची सुज्ञ जनता अनंत गीते यांना उत्तर देईल, असा घणाघात रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे.

तटकरे पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात काम केलं नाही, असं म्हणणारे अनंत गीते २०१४ च्या मंत्रिमंडळात होते, याचा त्यांना विसर पडला आहे. अनंत गीते स्वत: पाच वर्ष निष्क्रिय होते, याचा त्यांना विसर पडला आहे. तीस वर्षांच्या कार्यकाळात कोणता विकास केला? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाहीय. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत.

निष्क्रियता काय असते, हे अनंत गीते यांनी दाखवून दिलं आहे. स्वत:चं कर्तृत्व दाखवण्याची कोणतीच शक्यता नसते, तेव्हा ते अशाप्रकारचे आरोप करतात. मागील निवडणुकीत जनतेनं मला स्वीकारलं. त्यामुळे गीते जे आरोप करत आहेत, त्याची जनता दखल घेणार नाही, असंही तटकरे म्हणाले आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती