पंतप्रधानपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असतील असा चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेक प्रतिक्रिया देखिल येत असतात. यातच आता काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, 1996 साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला होता. १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते.