राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा आता निर्णय घेतला आहे. याच्याआधीसुद्धा कर्नाटकात विधानसभेसाठी काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते पण एकाही जागेवर त्यांना विजय मिळाला नव्हता.
आतासुद्धा राष्ट्रवादी निवडणूक लढवण्याचा आता निर्णय घेतला आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे जागा लढवणार असला तरी मराठी भाषकांच्या हिताला महत्त्व दिलं जाणार आहे.आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देऊ. कर्नाटकमध्ये २२४ मतदारसंघ असून काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभे करणार आहे. मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी सांगितले.