एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एक दोन नव्हे तर 40 आमदारांनी आणि इतर दहा समर्थ आमदार अशा 50 आमदार शिंदे गटात सामील झाले. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती शरद पवार साहेबांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला. तिथेच खरी गफलत झाली. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती. असे अजित पवार म्हणाले.
पुण्यात एका मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.