नवाब मलिक (Nawab Malik) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या एकूण 8 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहे. कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड (Goawala Compund), वांद्रे कुर्ला परिसरातील एक मालमत्ता, उस्मानाबादमधील जमी अशी मोठी संपत्ती ईडीने जप्त केली आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून, मनी लॉन्ड्रींग प्रकरणात (Money Laundering Case) ही कारवाई मलिकांनी केली आहे.
ईडीने याबद्दलची सविस्तर प्रेस रिलीज काढली असून, गोवावाला कम्पाऊंड खरेदीच्या व्यवहारात हसिना पारकरचा संबंध असल्याच्या आरोपातून ईडीने ही कारवाई केली आहे. वांद्रे आणि कुर्ला परिसरातील फ्लॅट्स ईडीने जप्त केला आहे. या प्रकरणात ईडीने मागच्या महिनाभरापासून या सर्व संपत्तीची पाहणी आणि तपासणी केली होती.