देशासह राज्यात कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदा निर्बंध मुक्त नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या येऊ घातलेल्या नवरात्र उत्सवासाठी ठिकठिकाणी तयारीला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता नायडू क्लबच्या वतीने बोरिवली येथील कोराकेंद्र मैदानात दरवर्षी साजरा होणारा नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. त्यानिमित्त आज याचं भूमिपूजन आज करण्यात करण्यात आले. नायडू क्लब आणि लोकशाहीच्या वतीने यंदा हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात नायडू क्लबचा नवरात्र उत्सव आणि गरबा, दांडिया प्रसिद्ध आहे. देशभरातील हजारो दांडिया रसिक याठिकाणी पारंपारिक वाद्यावर पारंपारिक वेशभूषा दांडिया व गरबा खेळण्याचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावत असतात.
या भूमिपूजनला खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते, या वेळी त्यांनी नायडू क्लबचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. सोबतच राजकीय लोकांना एकाठिकाणी पाहून आनंद वाटला असे ते बोलताना म्हणाले.
सोबतच या भूमिपूजनाला भरूच जामसुर येथील बापजी महाराज देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नायडू क्लबचे कौतूक केले. कार्यक्रम आनंदाने पार पडावा यासाठी त्यांनी आयोजकांना आशीर्वाद दिला.
आमदार मनिषा चौधरी यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्या म्हणाले की, संपूर्ण बोरिवलीत सर्वात मोठा नवरात्र उत्सव या कोराकेंद्र या ठिकाणी नायडू क्लब आयोजित करते . यावेळी सर्व जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद असतो. तेव्हा त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे त्यांनी आवाहन केले आहे.
त्यांनतर कार्यक्रमाचे आयोजिक ध्रुमित नायडू म्हणाले, की या आधी कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. दोन वर्षानंतर नागरिकांनी खूप वाट बघितली. त्यामुळे यावर्षी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी, स्थानिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.