Nanveet Rana - Ravi Rana Team Lokshahi
ताज्या बातम्या

राणा दाम्पत्यांचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलून केलं अटींचं उल्लंघन

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : खासदार नवणीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मिळाला असून, त्यांनंतर नवणीत राणांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज नवणीत राणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राणा दाम्पत्यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मात्र याच गोष्टीमुळे राणा दाम्पत्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत काय म्हणाले?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आता याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने जामीन देताना राणा दाम्पत्यांना शर्थ घातली होतली. संबंधीत गुन्ह्या संदर्भात राणांनी माध्यमांसोबत काहीही बोलु नये. या अटीचा त्यांनी भंग केला आहे. न्यायालयाने म्हटलं होतं की, माध्यमांशी संवाद साधल्यास त्यांना दिलेला जामीन हा रद्द करावा लागेल असं न्यायालयाने सांगितलं होतं असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. तसंच प्रदीप घरत उद्या न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.

दरम्यान, लीलावती रुग्णालयातून बाहेर आल्यावर नवणीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलतांना राणा म्हणाल्या की, "प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगण्यास तयार आहे. तुम्ही माझ्यावर दबाव टाकू शकत नाही. महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांची तक्रार मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार आहे. तसेच, संजय राऊतांचीही तक्रार करणार आहे." राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट आव्हान दिलंय. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढेल. तसेच आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news