Ravi Rana - Navneet Rana Team Lokshahi
ताज्या बातम्या

राणा दाम्पत्य दिल्ली दरबारी जाणार; तुरुंगात झालेला छळ PM मोदींना सांगणार

Navneet Rana यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच राणा दाम्पत्य दिल्ली गाठण्याची शक्यता.

Published by : Sudhir Kakde

अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेत आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला असून, सध्या नवणीत राणा लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार घेत आहे. नवणीत राणांना आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या थेट दिल्ली (Delhi) गाठणार असल्याची शक्यता आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणा व रवी राणा दिल्लीत जाणार असल्याती माहिती समोर आली आहे. दिल्लीला जाऊन नवनीत राणा पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटणार असल्याची शक्यता आहे. कारागृहात झालेल्या छळाची त्या दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे सरकारविरोधात राणा दाम्पत्य केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहेत.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय