Navneet Rana Team Lokshahi
ताज्या बातम्या

खासदार नवनीत राणांना Y प्लस सुरक्षा; केंद्र सरकारचा निर्णय

अतिमहत्वाच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा Y Plus Security For Navneet Rana) केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे नवनीत राणा यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी आता 24 तास 11कमांडो असणार आहेत.

नवनीत राणा यांचा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला असून, त्यानंतर त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याने केंद्र सरकारने त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

दरम्यान, दुसरीकडे नवनीत राणा यांनी आज हजारो महिलांच्या सोबत आज हनुमान चालीसाचे पठण केले. अमरावतीच्या रवी नगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 2 हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानंतर सध्या राज्यभरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत तापमानात घट, उपनगरांत पारा 20 अंशाखाली

भाज्यांची किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाईचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

Special Report | Vadgaon Sheri Vidhan Sabha Election | ऐन निवडणूकीत सुनील टिंगरेंना मोठा धक्का

NEWS PLANET With Vishal Patil | PM Modi | मोदींचं 'मिशन ग्लोबल साऊथ' ; असा असेल दौरा

Aditya Thackeray यांचा कदम पिता-पुत्रांवर निशाणा ; Ramdas Kadam यांचं जोरदार प्रत्युत्तर