जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला. जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे.
गेल्या 10 वर्षांपासून हरियाणात भाजपाची सत्ता असून भाजपने हरियाणात तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, हरियाणाचे जे निकाल लागलेत भारतीय जनता पार्टीने आज बहुमताने जी लीड घेतली आहे. तिथे बरेचसे अजेंडे फिक्स करत होते देशामध्ये की भारतीय जनता पार्टीला एवढेच सीट भेटणार, तेवढेच सीट भेटणार आहे. असा विरोध आहे, तसा विरोध आहे. पण हरियाणाच्या जनतेनं हे दाखवून दिलं आहे की, जो काम करेल त्याच्या पाठिशी हरियाणाची जनता राहिल.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याचपद्धतीने या महाराष्ट्राची जनतासुद्धा वन साईड बहुमत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला देणार आहे. याकरिता आमच्या देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या गृहमंत्री साहेबांना मनापासून खूप अभिनंदन देते आणि हरियाणाची जीत आपल्या कार्यामुळे. असे नवनीत राणा म्हणाल्या.