अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झाला. या राड्यादरम्यान नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या थोडक्यात बचावल्या. या सगळ्या घटनेनंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
त्या म्हणाल्या की, एकाही हल्लेखोरांना सोडणार नाही असं पोलिसांनी सांगितले आहे. मी शांत होती तरी देखील मला बघून काही लोकं आक्षेपार्ह नारे देत होते. मार देंगे काट देंगे म्हणत होते. काही लोकांनी माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. मारहाणीमध्ये माझ्या अंगरक्षकाला खुर्ची लागल्या. त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमचीही तशीच राहील आम्ही शांत बसणार नाही. कोणी एका गालावर मारेल तर आम्ही दोन मारु आता हिंदू शांत बसणार नाही, अस त्या आक्रमक होत म्हणाल्या. तसच खल्लार गाव हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षच गावं असल्याच त्या म्हणाल्या.
या सगळ्या घटनेची खल्लार पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.