कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या रंगतदार सामन्यात आरसीबीचा १ धावेनं पराभव केला. परंतु, केकेआर विरोधात झालेल्या या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. विराट कोहलीच्या नो बॉल वादावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. अशातच आता भारताचे माजी दिग्गज खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांनीही विराट कोहली ज्या चेंडूवर बाद झाला, तो नो बॉल होता की नाही, यावर एका व्हिडीओच्या माध्यमातून मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
विराटने सलामीला येत केकेआरच्या गोलंदाजांचा सुरुवातीलाच धुव्वा उडवला होता. हर्षित राणा आणि मिचेल स्टार्कला षटकार ठोकून विराटने आरसीबीला जबरदस्त सुरुवात करुन दिली होती. हर्षितच्या गोलंदाजीच्या तिसऱ्या चेंडूवर विराट झेलबाद झाला. परंतु, तो चेंडू उंचीच्या नियमानुसार अधिक उसळी घेणारा होता, असं विराटचं म्हणणं होतं. पण तिसऱ्या पंचांनी स्क्रीनवर चाचपणी केल्यानंतर विराटला बाद घोषित केलं. पंचांच्या या निर्णयावर विराट कोहलीनं आक्षेप घेतला आणि पंचांसोबत बाचाबाची केली.
इथे पाहा नवज्योतसिंग सिद्धू यांचा व्हिडीओ
विराट कोहली ज्या चेंडूवर बाद झाला, तो नो बॉल होता की नाही, याबाबत भारताचे माजी दिग्गज खेळाडी नवज्योतसिंग सिद्धूनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच सिद्धून नियम बदलण्याबाबतही भाष्य केलं आहे. सिद्धूने त्या चेंडूबाबत या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती दिली आहे.