ताज्या बातम्या

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद; कारण काय?

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांनी हा निर्णय घेतल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा  मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे.

काही गावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही आहे. राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असून मनोज जरांगेंना अनेक ठिकाणांहून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

Mns Candidate List: मोठी बातमी! मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

Bhaskar Jadhav on Shivsena UBT Candidate List: भास्कर जाधवांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले जाधव

Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया