Dombivali MIDC Blast 
ताज्या बातम्या

डोंबिवली MIDC स्फोट प्रकरण; फरार झालेल्या मुख्य आरोपी मालती मेहतांना नाशिकमधून अटक

Published by : Naresh Shende

Amudan Company Owner Malti Mehta Arrested : डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमध्ये असलेल्या अमुदान कंपनीत काल गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेनंतर कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीचे मालक आणि मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता फरार झाल्या होत्या. परंतु, नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत मालती मेहतांना अटक केली आहे.

डोंबिवली एमआयडीसीत झाला होता मोठा स्फोट

डोंबिवलीच्या एमआयडीसीत असलेल्या अमुदान कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. एमआयडीसीच्या फेज- २ मध्ये हा स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर होती की, आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले होते. या स्फोटामुळे अनेक जण जखमी झाले तर ११ जणांचा मृत्यू झाला. या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानं आजूबाजूला असलेल्या वसाहतींच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू