विशाल मोरे, मालेगाव
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचं थैमान घातलं आहे. सततच्या पावसाने मनमाडच्या निमोण भागात कांदा पिकाला मोठा. फटका बसला असून, काढणी आलेल्या लाल कांद्याचे शेतात गुडघाभर पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे.
काढणीसाठी आलेल्या लाल कांद्याच्या शेतात पावसाचा पाणी शिरल्याने मनमाडमधील कांदा पिकाला मोठा फटका बसला असून शेतातील पाण्यामुळे संपूर्ण कांदा पीक खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऐन सणासुदीच्या काळात कांदा उत्पादक हतबल झाला असून दोन दिवस उलटूनही कुठलीही शासकीय यंत्रणा पंचनामा करण्यास न आल्याने शेतकरी चिंता लागली आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी करण्यात येत आहे.