महेश महाले, नाशिक
नाशिकची सिटी लिंक बससेवा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहकांचं वेतन रखडल्यानं सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. वाहकांचं 2 महिन्यांपासून वेतन रखडलं आहे. बससेवा बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत.
ही संपाची सातवी वेळ असून प्रवाशांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहे. या संपामध्ये जवळपास 500 वाहक सहभागी झाल्याने रस्त्यावरची सिटी लिंक प्रवासी वाहतूक सेवा ही बंद पडली आहे. बस डेपोतून एकही बस बाहेर पडली नसल्याने नाशिककरांना याचा मनस्ताप झाला आहे.