शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबत खळबळनजक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत.
नरेश म्हस्के म्हणाले की, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामुळे अजितदादांसारखा माणूस शरद पावरांपासून लांब गेला आहे. प्रथम बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचं काय होईल याकडे लक्ष द्यावे मग श्रीकांत शिंदेंच काय होणार याची काळजी करावी. रोहित पावरांची अवस्था काय आहे हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल. तुम्ही अजितदादा आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वासमोर आपण आधी बारामती लढवून दाखवा, त्यानंतर आम्हाला आव्हान किंवा सल्ले द्या, असंही म्हस्के यांनी म्हटल आहे.
दरम्यान त्यांनी नागपुरात 4 तासांत ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने इतकं पाणी आलं. तिथले नेते सक्षम आहेत. मात्र आपलं काय मुंबई मध्ये 24 वर्षे सत्ता होती. तेव्हा थोडासा पाऊस पडला तरी पूर्ण मुंबई पाण्यात बुडायची, लोकल बंद व्हायच्या. मात्र यावर्षी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले आणि यंदा मुंबईत कुठेही पाणी तुंबली नाही, असंही म्हस्के यांनी म्हटलं आहे.