Narendra Modi Team Lokshahi
ताज्या बातम्या

SPG : मोदींच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत सहभागी असलेल्या SPG जवानांनी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून खाली उतरवले.

Published by : Team Lokshahi

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत सहभागी असलेल्या SPG जवानांनी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून खाली उतरवले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आयएनएस शिकारावर गेले होते.

पीएम नरेंद्र मोदी आज राजभवनात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुण्याहून मुंबईत आले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पंतप्रधानांचे स्वागतसाठी पोहोचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसपीजीने सांगितले की, आयएनएस शिखर तळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करणाऱ्या व्हीआयपींच्या यादीत आदित्यचे नाव नाही. त्यानंतर आदित्य यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून खाली उतरण्यास सांगण्यात आले.

उद्धव यांनी खुलासा केला...

एसपीजीच्या या वर्तनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी युक्तिवाद केला की, आदित्य हा त्यांचा मुलगा म्हणून तर प्रोर्टोकाल मंत्री म्हणून आले आहे.

राजभवनात आजचा कार्यक्रम

पंतप्रधान मोदी राजभवन येथे नूतनीकरण केलेल्या ‘जलभूषण’ निवासी इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ज्यामध्ये राज्यपालांचे कार्यालय आणि निवासस्थान असेल. यावेळी ते राजभवन संकुलातील ऐतिहासिक श्री गुंडी मंदिरालाही भेट देणार आहेत.

गॅलरीत काय खास आहे...

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांना श्रद्धांजली म्हणून, 2016 मध्ये राजभवनाच्या खाली सापडलेल्या बंकरमध्ये भारतीय क्रांतिकारकांची गॅलरी बांधण्यात आली आहे. ज्या वर्षी भारत प्लॅटिनम ज्युबिली साजरी करत आहे त्या वर्षी हे समर्पित केले जात आहे. इतिहासकार व लेखक डॉ.विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या दक्षिण मध्य प्रादेशिक सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने क्रांतिकारकांचे दालन तयार करण्यात आले आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा