Crime News  Team Lokshahi
ताज्या बातम्या

धुळे, जालन्यानंतर आता नांदेडमध्येही सापडल्या तलावारी; गृहविभागासमोर मोठं आव्हान

Published by : Sudhir Kakde

नांदेड | कमलाकर बिरादार : नांदेडमध्ये (Nanded) मध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडच्या शिवाजी नगर पोलिसांनी (Nanded Police) आज परिसरातून 25 तलवारी जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे सध्या परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या तलवारी पंजाब मधून आणल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून, त्याची सध्या चौकशी सुरु आहे. (Nanded police seized swords in Shivaji Nagar)

राज्यात मागच्या दोन तीन दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तलवारी सापडत आहेत. त्यामुळे गृहविभागासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. काही दिवासांपूर्वी पोलिसांना धुळ्यात मोठ्या प्रमाणात तलावीर सापडल्या होत्या. त्यानंतर काल जालन्यातही पोलिसांना मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्या. या घटनेला 24 तासही उलटत नाहीत, तोच पोलिसांनी आता आज नांदेडमध्येही तलवारी जप्त केल्या. नांदेडच्या शिवाजी नगर पोलिसांनी परिसरातून 25 तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारी अमृतसर येथून सचखंड एक्सप्रेस रेल्वेने नांदेड येथे आणल्या होत्या. या प्रकरणात 18 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

आरोपी या तलवारी गोकुळ नगर मार्गे ऑटोतुन घेऊन जात होता, त्यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीसह 25 तलवारी जप्त केल्यात. शहरात वारंवार देसी कट्टे व तलवारी सापडत असल्याने नांदेडकर भयभीत झाले आहेत. तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात हत्यारं सापडत असल्यानं चिंता निर्माण झाली आहे. धुळ्यात 89 तलवारींसह इतर हत्यारं, जालन्यातही 89 तलवारी सापडल्या आहेत. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी देखील सरकारला प्रश्न विचारले आहेत. तर दुसरीकडे राज्यात भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा हा वाद सुरू अससल्याने धार्मिक तणाव निर्माण होण्याची देखील भीती आहे. एकुणच या पार्श्वभूमीवर गृहविभागासमोर मोठं अव्हान निर्माण झाला आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने