नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता पुन्हा 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यावर अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी. असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.