महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचा निषेध करण्यात येत असून संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडेंना फाशी देणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
नाना पटोले म्हणाले, “राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, महापुरुषांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांच्या केवळ मुसक्या बांधू नये, तर रस्त्यावर फाशी द्यावी असं त्यांचं मत आहे. आता आमचा सवाल आहे की, संभाजी भिडेंना देवेंद्र फडणवीस देणार का?”
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले, असे संभाजी भिडे यांनी म्हंटले होते.