नेपाळ येथे पशुपतिनाथांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला अपघात होऊन त्यात २७ जणांना मृत्यू झाला. नुकतेच या अपघातातील मृतांवर त्यांच्या गावात एकाच वेळी अंत्य संस्कार करण्यात आले आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी ‘लखपती दीदीं’चा मेळावा जळगाव विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. यावरच सरकार आणि पंतप्रधानांना थोड्या जरी भावना अथवा थोडी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले, जळगाव येथे आयोजित कार्यक्रम हा जनतेच्या पैशाने होतोय, हा शासकीय कार्यक्रम आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पैशाने कार्यक्रम घेऊन सरकार पीडितांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय. असं ते म्हणाले.
सरकार आणि पंतप्रधानांना थोड्या जरी भावना अथवा थोडी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे हे लखपती दीदीचा उत्साह साजरा करत आहेत. आजवरच्या इतिहासात सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिलाय, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सुद्धा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. मात्र सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल? यावरून महाविकास आघाडीतच बिघाडी पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा चेहरा राहणार आहे. हाविकास आघाडीत मुख्यमंत्री ह्या पदापेक्षा महाराष्ट्र ची संस्कृती धर्म वाचविण्यासाठी आम्ही काम करतो असं ते म्हणाले.