ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली; नाना पटोले म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया दिली आहे.

यावर नाना पटोले म्हणाले की, मत फुटलेल्याचे जे तुम्ही सांगत आहे. हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेसही हा प्रकार झाला. त्यावेळेस बदमाश काही लोक होतीत. यावेळेस आम्ही ट्रॅप लावला या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोक सापडली आहेत. वरिष्ठांना आम्ही हे कळवलं आहे.

यासोबतच नाना पटोले म्हणाले की, लवकरच हे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं. पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली. अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला या सर्व रिपोर्ट सादर केलेला आहे. असे नाना पटोले म्हणाले.

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ; नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले...

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची शपथविधी, 'या' आमदारांनी घेतली शपथ