नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भावी हे भावीच राहणार असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं. या वक्तव्यावर नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. मी मुख्यमंत्री होणारच असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानं मविआत बिघाडीची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
भंडारा जिल्ह्यात बुधवारी प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता "भावी हे भावीच राहतील", असं वक्तव्य केलं होत. त्यावर नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. "मला आमदार होऊ देत नव्हते. आमदार झालो, खासदार होऊ देत नव्हते खासदार झालो, विधानसभा अध्यक्ष सुध्दा झाले आणि आता मुख्यमंत्री होणारच" असं वक्तव्य नाना पटोले यांनी भंडारा येथे केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळणार आहे.