Nana Patekar 
ताज्या बातम्या

लोकसभा निवडणूक लढणार का? नाना पाटेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, "राजकारण माझा..."

"मी निवडणूक लढवणार अशी खूप चर्चा आहे. पण कोणत्या भागातून निवडणूक लढवतोय, ते कळलं तर बरं होईल."

Published by : Naresh Shende

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या जागेवर पाटेकर निवडणूक लढवणार असल्याचं बोलंल जातंय. परंतु, पाटेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे. "राजकारण हा माझा प्रांत नाही. समाजकार्य करण्यात जे समाधान आहे, मला राजकारणात मिळणार नाही, असं मला वाटतं. राजकारणात मनात आलेलं आपण सर्व बोलून टाकतो, पण ते कुणाला पटेल आणि कितपत मला राहू देतील, हा प्रश्न आहे", असं पाटेकर म्हणाले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या समाजकार्याबाबत अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

राजकारणावर बोलताना पाटेकर पुढे म्हणाले, "मी निवडणूक लढवणार अशी खूप चर्चा आहे. पण कोणत्या भागातून निवडणूक लढवतोय, ते कळलं तर बरं होईल. अमोल कोल्हेंच्या जागेवर तुमच्या नावाची चर्चा होती, असा प्रश्न विचारला असता पाटेकर म्हणाले, राजकारण हा माझा प्रांत नाहीय. महाराष्ट्र सरकारसोबत एमओयू झालेला आहे.

पण आपली चळवळ महाराष्ट्रपुरती मर्यादीत राहिलेली नाही. काश्मीर, गुवाहाटी, राजस्थानमध्ये ही चळवळ करतोय. उत्तरप्रदेशातही सुरू असून आपण बुंदेलखंडातही सुरु करणार आहोत. प्रत्येकाने दिलेले सीएसआर फंड असतात आणि त्यांची इच्छा आहे की, आम्ही इथे काम करावं. महाराष्ट्राला प्राधान्य असेलच पण भारतभर आपल्याला काम करता येणार आहे."

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला मुदतवाढ

रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये सभा