निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत संजय राऊत म्हणाले की, आम्ही अशी अपेक्षा करतो की, मविआच्या जागा वाटपाची चर्चा अधिक वेगाने व्हावी आणि तातडीने येणं गरजेचं आहे. मला कारणामध्ये जायचं नाही पण नक्कीच 200 पेक्षा जास्त जागांची मविआमध्ये सहमती आहे.
उरलेल्या जागांचा तिढा पडलेला आहे. त्यासंदर्भात आज मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. इलेक्शन कमिशनने काही जाचक आणि विरोधीपक्षाला अडचणीत आणणारे काही निर्णय जाहीर केलेले आहेत. तसेच ते फक्त भाजप आणि सध्याचं मिंधे गट त्यांना मदत होईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय हे निष्पक्ष नाही, ते भाजपची बी ,सी आणि डी टीम आहेत.