ताज्या बातम्या

Nagpur | मोक्षधाम ते बस स्थानक चौकापर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

सीमेंट रोड बांधकामाकरिता मोक्षधाम चौक ते बस स्थानक चौकापर्यंतची वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

Published by : Team Lokshahi

कल्पना नळसकर | नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे (Nagpur Municipal Corporation) सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्पाअंतर्गत मोक्षधाम चौक ते बस स्थानक चौकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने ३१ सप्टेंबर २०२२ पर्यंत मोक्षधाम चौक ते डालडा कंपनी चौकापर्यंत दोन्ही बाजुचा रस्ता कोणत्याही वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. नमूद रस्त्यावरील वाहतूक मोक्षधाम चौक ते सरदार पटेल चौक ते इमामवाडा चौक ते डालडा कंपनी मार्गाने दुतर्फा जाईल तसेच इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्याचे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या दक्षते संदर्भात आयुक्तांनी आदेश नमुद केले आहे. त्यानुसार कामाच्या ठिकाणी सुचना फलक व काम सुरु केल्याची/ काम पूर्ण करण्याची दिनांक असलेला बोर्ड लावावा. पर्यायी मार्ग सुरु होतो त्या ठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतूक सुरक्षा रक्षक/ स्वयंसेवक नमावे. वाहतूक सुरक्षारक्षक, वाहतूक चिन्हांच्या पाटया, कोनस, बॅरिकेट्स दोरी रिफलेक्टीव्ह जॅकेटस, एल.ए.डी. बॅटन, ब्लिकर्स, इत्यदी संसाधने उपलब्ध करावे, काम सुरु झाल्यानंतर जमीनीतुन निघणारे मटेरीयल उदा. माती, गिट्टी, पिवर ब्लॉक, वगैरे मुळ घसरण निर्माण होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकू नये. त्याकरीता विशेष व्यवस्था करण्यात यावी. काम झाल्यानंतर सदर्हु बांधकाम दरम्याण पर्यायी मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे बुजवुन त्यावर सिमेंटीकरण / डांबरीकरण करुन रोड पुर्ववत करावा.

पर्यायी मार्ग सुरु होतो त्याठीकाणी व काम करणार आहे त्या मार्गाचे बाजुला लोकांना दिसेल अशा ठिकाणी पर्यायी मार्गाबाबत वळण मार्ग सविस्तर माहिती असणारे फलक लावण्यात यावेत. रात्रीचे वेळी वाहनचालकंना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुने दुतर्फा वाहतूक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतूक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतूक नियमांचे तसेच वाहतुक पोलीसंनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरीता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट