Admin
ताज्या बातम्या

गुजरातमध्ये अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं ३७६ कोटींचं हेरॉइन

गुजरातमध्ये अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ ३७६ कोटींचं हेरॉइन सापडलं असल्याचा माहिती मिळत आहे

Published by : Siddhi Naringrekar

गुजरातमध्ये अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ ३७६ कोटींचं हेरॉइन सापडलं असल्याचा माहिती मिळत आहे. कच्छ जिल्ह्यामध्ये अदानी समुहाच्या मलकीच्या मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये ३७६ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आला. याची माहिती गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितलं आहे.

गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७५.३ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. याच्या आधीसुद्धा गुजरातमधील याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते.

१३ मे रोजी मुंद्रा बंदरामध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणण्यात आला. हा माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता. या कंटेरनमधील अमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे पाईप वापरण्यात आले होते. हे पाईप कार्डबोर्डचे वाटू नयेत म्हणून त्यावर निळ्या रंगाचं प्लास्टिक लावून हेरॉइन लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतची सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय