ताज्या बातम्या

BMC Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' तीन भागात 24 तास पाणीपुरवठा बंद

दक्षिण मुंबईतील चर्चगेटपासून मशीद बंदर, भायखळा परिसरात बुधवार, 17 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवार 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

Published by : Team Lokshahi

दक्षिण मुंबईतील चर्चगेटपासून मशीद बंदर, भायखळा परिसरात बुधवार, 17 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवार 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी 1200 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन सदर ठिकाणी नवीन 1200 मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱया जुन्या 1200 मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार, दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:00 वाजेपासून ते गुरुवार, दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या कालावधीत ए (चर्चगेट, कुलाबा), बी (मशीद बंदर,डोंगरी) आणि ई (भायखळा, माझगाव) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सदर कामाच्या कालावधीत ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सदर परिसरांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1) ए विभाग-

नेव्हल डॉकयार्ड सप्लाय - सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 1:30 ते सायंकाळी 4:15 आणि रात्री 9:30 ते मध्यरात्री 1:00) - दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

2) ई विभाग–

नेसबीट झोन (1200 मि.मी. आणि 800 मि.मी.) - ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 4:00 ते सकाळी 6:30) - दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

म्हातारपाखाडी रोड झोन - म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 6:30 ते सकाळी 8:15) - दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

डॉकयार्ड रोड झोन - बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 12:20 ते दुपारी 2:50) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

हातीबाग मार्ग - हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 3:20 ते सायंकाळी 5:00) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

जे. जे. रुग्णालय – (24 तास पाणीपुरवठा) – कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन - मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 4:45 ते सायंकाळी 5:55) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

रे रोड झोन - बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक 1-3 (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 7:00ते रात्री 8:15) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

माऊंट मार्ग - रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 7:15 ते रात्री 9:00) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

3) बी विभाग–

बाबूला टँक झोन - मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 4:40 ते सकाळी 6:10) – दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

डोंगरी बी – झोन - नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 4:40 ते सकाळी 6:10) - दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

डोंगरी ‘ए’ झोन - उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 8:30 ते रात्री 10:00) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन - सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 4:30 ते सायंकाळी 6:30 आणि रात्री 11:30 ते मध्यरात्री 2:00) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

मध्म रेल्वे – रेल्वे यार्ड (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 7:00 ते रात्री 8:00) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

वाडी बंदर - पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 4:20 ते सायंकाळी 5:30) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

वाडी बंदर - पी. डिमेलो मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 7:15 ते रात्री 8:00) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

आझाद मैदान बुस्टींग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 4:40ते सकाळी 6:00) - दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

दरम्यान, संबंधित परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, दिनांक 17 व 18 जानेवारी 2024 रोजी पाणी जपून वापरावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका