Mumbai Railway Block  Google
ताज्या बातम्या

Mumbai Railway: गर्डर लॉन्चिंगच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, वाचा सविस्तर माहिती

कर्नाक बंदर ब्रिजचे गर्डर लॉन्च करण्याच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. २० जुलै ते २१ जुलैला रात्री हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Published by : Naresh Shende

Mumbai Railway Block Update: कर्नाक बंदर ब्रिजचे गर्डर लॉन्च करण्याच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. २० जुलै ते २१ जुलैला रात्री हा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्यरात्री ००.३० पासून ते ०४.३० वाजेपर्यंत ( ०४:०० तास) हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर लाँचिंग ब्लॉकच्या कामासाठी विशेष पोर्टल बूमच्या उभारणीसाठी हा पॉवर ब्लॉक असणार आहे.

'या' एक्स्प्रेस गाड्या दादर स्टेशन येथे स्थगित केल्या जातील

12870 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस

11058 अमृतसर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस

12052 मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस

22120 मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस

11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस

12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल

ब्लॉक दिनांक: २०/२१.०७.२४ (शनिवार/रविवार रात्री)

ब्लॉक कालावधी: मध्यरात्री ००.३० पासून ते ०४.३० वाजेपर्यंत ( ०४:०० तास)

ट्रॅफिक ब्लॉक :

भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गिका

अप आणि डाऊन जलद मार्ग (सातव्या मार्गासह आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शंटिंग नेकसह)

वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर लाईन्स (७वी लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शंटिंग नेक-२ सह)

रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम

ब्लॉक कालावधीत मेन लाईनवर भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच हार्बर लाईनवर वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट केल्या जातील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानका पर्यंत/पासून शॉर्ट टर्मिनेट /शॉर्ट ओरीजनेट केल्या केल्या जातील.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी