मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास महागणार असून 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून ही टोल दरवाढ करण्यात येणार आहे. मुंबई एक्स्प्रेस वेसाठीसुद्धा वाहनांना जास्तीचा टोल भरावा लागू शकतो.
1 एप्रिलपासून टोल दरांत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. यात कारचा टोल 316 रुपये होणार आहे. बससाठी टोलचा 940 रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी 685 रुपये द्यावे लागणार आहे. तर टेम्पोसाठी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.