ताज्या बातम्या

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या संरक्षण, सुरक्षा विभागाची विशेष बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेरआढावा घेण्याचे काम सध्या सुरु असून यामध्ये बाबा सिद्दिकी यांच्या प्रकरणानंतर कोणत्याही परिस्थिती सुरक्षारक्षकांना नियमावलीचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

यावेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले असून पोलीस सुरक्षा रक्षकांनी त्यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.

'मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेयं' आदित्य ठाकरेंचा आरोप

Rail Ticket Reservation:रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून काय आहेत "हे" बदल...

Sameer Wankhede vidhansabhaelection | समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात ? कोणत्या पक्षाकडून लढणार ?

Maharashtra Assembly Election: 'आप' पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार नाही! पक्षाचं दिल्लीवर विशेष लक्ष...

BJP Vidhan Sabha Election Updates : भाजप सुमारे 153 जागांवर लढण्याची शक्यता