Admin
ताज्या बातम्या

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एन्ट्री

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एन्ट्री झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा एन्ट्री झाली आहे. 2021 मध्ये अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती. एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून दया नायक यांची ओळख आहे.

दया नायक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. आज पोलीस दलात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दया नायक सध्या दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. या नायक यांनी 1996 मध्ये पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास 80 गुंडाचे एन्काउंटर केले आहेत. अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आले होते. 2016 मध्ये त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली.

IPL Mega Auction 2025 Live: कृणाल पांड्याला आरसीबीच्या ताफ्यात

Latest Marathi News Updates live: भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

Sanjay Raut Vs Ajit Pawar | EVM ला दोष देणं म्हणजे... संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवार यांचा उत्तर

Maharashtra vidhansabha results 2024 : मोदींनी सभा घेतलेले किती उमेदवार विजयी?

लातूर ते मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मुंबई-लातूर, मुंबई-बीदर रेल्वेमध्ये 3 कोचेस वाढले