ताज्या बातम्या

Mumbai Local : पावसाचा मध्य रेल्वेला फटका, 'लोकल' ट्रेन धीम्या गतीने सुरू

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल (Local) सेवेला बसला आहे. त्यामुळे लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिटं विलंबाने धावत आहेत. त्यामुळे लोकल धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. आज मुंबईसह नवी मुंबई, ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. बुधवारी पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल (Local) सेवेला बसला आहे. त्यामुळे लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिटं विलंबाने धावत आहेत. त्यामुळे लोकल धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतूक आणखी कोलमडण्याची शक्यता आहे. तुर्तास हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्मागवरील वाहतूक सुरळीत आहे.

मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात सोमवारी सकाळपासून पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे या जोरदार पावसाचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्टेशन दरम्यान मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या स्टेशनदरम्यान काही ठिकाणी रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या काही ट्रेन या 20-25 मिनिटं विलंबाने धावत आहे. तर हार्बर मार्गावरील ट्रेन्स १० मिनिटे विलंबाने धावत आहेत. मात्र, ट्रेन्स कुठेही थांबलेल्या नाहीत. तसेच ट्रेन्स हार्बर व नेरूळ/ बेलापूर खारकोपर मार्गावर ट्रेन्स सुरळीत सुरू आहेत.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर साधारण पावणेबाराच्या सुमारास भरती येणार आहे. तोपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील पाण्याचा निचरा होणे अवघड होईल. त्यामुळे सखल भागांमध्ये आणखी पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर या सगळ्याचा कितपत परिणाम होणार, हे पाहावे लागेल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी