Mega Block  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Mumbai Local Mega Block : आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या

Published by : Team Lokshahi

आज रविवारी (31 जुलै) रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक ठेवला आहे. हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर असणार आहे. सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही. पनवेल ते कुर्ला दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने चालवल्या जाणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेनलाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान या दोन स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. तर काही लोकल गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दरम्यानच्या दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यान अप-डाऊन लोकल धावणार नाहीत. मात्र, पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ठाणे-वाशी, नेरुळ अप-डाऊन येथेही मेगाब्लॉक राहणार आहे. मात्र, सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक टाकण्यात आलेला नाही.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?