डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर वगळूता आणि पनवेल यासोबत दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मुंबई मध्य रेल्वेच्या उपनगरीय हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकच्या आधी पनवेलहून अप हार्बर मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी, रात्री 10.35 वाजता पनवेलहून सुटणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यानच धावणार आहे.
हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत. पनवेलसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन दोन ऑक्टोबर रोजी दुपारी 12.08 वाजता सुटणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 11 सप्टेंबरपासून रात्रकालीन ब्लॉक सुरू करण्यात आला होता. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
30 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11 वाजल्यापासून 2 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत 38 तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.