मुंबईत पावसाची संततधार सुरुच आहे. पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी, रेल्वेसेवेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. आज सुद्धा मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुपारी 02 वाजून 33 मिनिटांनी समुद्रात मोठी भरती येणार असल्याची माहिती मिळत आहे. समुद्रात 4.31 मीटर इतक्या उंच लाटा उसळण्याची शक्यता असून प्रशासनाकडून नागरिकांना समुद्राकिनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.