आज 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतील गिरगांव, दादर, जुहू, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह 73 नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त 160 हून अधिक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
यासोबतच मुंबई पोलीस दलाकडून 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात असून अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, ६० फिट रोड, माहिम सायन लिंक रोड, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल. बी. एस. रस्ता, न्यु मिल रोड, संत रोहिदास मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलाना आझाद रोड, बेलासिस रोड, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग.