कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या विशेष सूचना जारी केल्या आहेत. कामा रुग्णलय, सेंट जॉर्ज रुग्णालय ,टाटा रुग्णालय, जगजीवन राम रुग्णालय हे राज्य सरकारी रुग्णालय व इतर खाजगी 26 रुग्णालयं हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आहेत. मुंबईत ट्रेसिंग टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणावर लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे. कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालय, बेड्स, ऑक्सिजन बेड्सची सोय केली जाईल.मुंबई महापालिका कोरोना नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू ठेवणार आहे.
तसेच नागरिकांसाठी बीएमसीच्या विशेष सूचना दिल्या आहेत त्या म्हणजे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. वेळोवेळी हात व्हावे व स्वच्छता बाळगावी. आजारी वाटल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास घरी थांबावे. ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच डायबिटीक किंवा हायपर टेन्शन रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून बूस्टर डोस घ्यावा.असे सांगण्यात आले आहे.